Congress Satyagrah In Rajghat Support Rahul Gandhi Priyanka Gandhi  
देश

Rahul Gandhi: राजघाटावर राहुल गांधी यांचा आज सत्याग्रह; प्रियांका गांधींनी घेतली मोठी जबाबदारी

दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह

सकाळ डिजिटल टीम

लोकसभेचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आज दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह करणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सत्याग्रह चालणार आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

शनिवारी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीजवळ रविवारी काँग्रेस दिवसभर संकल्प सत्याग्रह करणार आहे. केरळमधील वायनाडमध्ये पक्षाने शनिवार हा काळा दिवस म्हणून पाळला. अनेक शहरांमध्ये विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, तुरुंगात टाका, तरी मी घाबरणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काल केलं आहे. माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून मोदींनी मला अपात्र केलं. ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली, असंही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसनं देशभरात 'जनआंदोलन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेसोबतच राहुल गांधींच्या अपात्रतेबाबत जनजागृती कार्यक्रम, राज्यघटना वाचवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हे आंदोलन सोमवारपासून (27 मार्च) सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT