Arif Akil Passes Away  esakal
देश

Arif Akil: काँग्रेसला मोठा धक्का! 6 वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते आरिफ अकील यांचे निधन

Arif Akil Passes Away : खराब प्रकृतीमुळे आरिफ अकील यांनी 2023 मध्ये भोपाल उत्तर मतदारसंघातून आपल्या मुलाला तिकीट दिले होते. सध्या आरिफ यांचे पुत्र आतिफ अकील भोपाळ उत्तरचे आमदार आहेत.

Sandip Kapde

मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते आरिफ अकील यांचे दीर्घकालीन आजारामुळे निधन झाले आहे. ते भोपाल उत्तर विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिले होते. तसेच, दोन वेळा मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्यक कल्याण, जेल आणि खाद्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरिफ अकील पहिल्यांदा 1990 मध्ये आमदार झाले होते.

2023 मध्ये मुलाला दिली तिकीट-

खराब प्रकृतीमुळे आरिफ अकील यांनी 2023 मध्ये भोपाल उत्तर मतदारसंघातून आपल्या मुलाला तिकीट दिले होते. सध्या आरिफ यांचे पुत्र आतिफ अकील भोपाळ उत्तरचे आमदार आहेत.

भोपाळ गॅस लीक हादसा आणि आरिफ नगर-

1984 मध्ये झालेल्या यूनियन कार्बाइड गॅस लीक हादस्यानंतर आरिफ अकील यांनी जनतेत आपले अस्तित्व तयार करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांनी गॅस त्रासदीच्या पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक नवीन कस्बा 'आरिफ नगर' वसवला. या ठिकाणी गॅस त्रासदीतील पीडित आणि त्यांचे कुटुंबीय बसले.

काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असताना आरिफ अकील यांनी गॅस त्रासदीच्या पीडितांना मोबदला मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. भोपाळ उत्तर मतदारसंघात सुमारे 54 टक्के मुस्लिम मतदार आहेत, परंतु सिंधी समाजाचे मतदार देखील चांगले आहेत.

आरिफ अकील यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने मध्य प्रदेश काँग्रेसने एक अनुभवी आणि निष्ठावान नेते गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT