Sonia Gandhi  Esakal
देश

Womens Reservation Bill: महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा; सोनिया गांधी म्हणाल्या, 'हे राजीव गांधी यांचं स्वप्न....'

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर आज चर्चा सुरू झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर आज चर्चा सुरू झाली आहे. आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते या विधेयकावर चर्चा करणार आहेत. तर यावेळी बोलताना काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा देत असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत बोलताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, 'महिला आरक्षण हे माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते. नंतर ते पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने मंजूर केले. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होणार आहे.'

पुढे बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, 'स्त्री ही आपल्या महान देशाची जननी आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आहेत. स्त्री हे त्यागाचे प्रतिक आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचे मोजमाप करणे कठीण आहे. स्त्रियांमध्ये समुद्रासारखा संयम असतो. महिला आरक्षण विधेयक सर्वप्रथम काँग्रेसने मंजूर केले. या विधेयकाला माझा पाठिंबा आहे,'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

SCROLL FOR NEXT