Donald Trump
Donald Trump 
देश

‘इंडिया फर्स्ट’बाबत मोदी गप्प का 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज ट्विटच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले.

भारत- अमेरिका व्यापार, एच-१ बी व्हिसा, राष्ट्रीय सुरक्षा, तेलाच्या किंमती आणि स्टील निर्यात आदींबाबत पंतप्रधान गप्प का आहेत? असा सवाल सुरजेवाला यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला असताना आपले पंतप्रधान इंडिया फर्स्टबाबत गप्प का आहेत? असा सवाल करतानाच त्यांनी ट्रम्प प्रशासनाने वाढविलेले आयातशुल्क आणि त्याचा स्टील उद्योगावर झालेला परिणाम याचा उल्लेख केला आहे. 

दिल्लीत कडेकोट बंदोबस्त 
ट्रम्प यांचे वास्तव्य असणाऱ्या हॉटेल आयटीसी मौर्यभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून भारतीय आणि अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणा संयुक्तपणे हे काम करत आहेत. ड्रोनविरोधी एनएसजीची यंत्रणा, स्नायपर्स, स्वात कमांडो, काईट कॅचर, श्‍वान पथके, शार्प शूटर यांच्याबरोबरच पराक्रम पथकाच्या विशेष गाड्याही ट्रम्प यांच्या मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. सहा जिल्ह्यांतील पोलिस तुकड्या दिल्लीत तैनात करण्यात आल्या असून केंद्रीय पोलिस दलांच्या चाळीस कंपन्यांना थेट कृतीसाठी तैनात करण्यात आले आहे. सरदार पटेलमार्गावरील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये चोवीस तास सीसीटीव्ही वॉच आहे. 

हॉटेलात शाही बडदास्त 
दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये ट्रम्प यांच्यासाठी शाही बडदास्त ठेवण्यात आली असून अलिशान खासगी स्पा बरोबरच फूड टेस्टिंग लॅबही येथे थाटण्यात आली आहे. या हॉटेलातील आलिशान खोलीमध्ये ट्रम्प यांचे वास्तव्य असेल. पाहुण्यांना स्वच्छ हवा मिळावी म्हणून विशेष यंत्रणाही हॉटेलात तयार ठेवण्यात आली आहे. हॉटेलातील चाणक्य नावाचा प्रेसेडेन्शियल सूट ट्रम्प यांच्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. कधीकाळी याच सूटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्लू बूश यांचेही वास्तव्य होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT