National Herald Case | ED Summons to Sonia Gandhi esakal
देश

सोनिया गांधींना पुन्हा ईडीचं समन्स; काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

आज पक्षानं एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज पक्षानं एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

आज पक्षानं एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली असून त्यात सर्व सचिव, प्रदेश प्रभारी, पीसीसी प्रमुखांना बोलावण्यात आलंय. या बैठकीत भारत जोडो यात्रा आणि संघटनेच्या कार्यक्रमावर चर्चा होणार आहे. या बैठकीत पक्षाचे प्रमुख सहभागी होणार असून या आंदोलनादरम्यान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चा आणि इतर कार्यक्रमांवरही चर्चा होणार आहे. 18 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे (Congress) खासदारही सभागृहात आंदोलन करू शकतात. (National Herald Case)

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या शेरनी आहेत. त्यांना असल्या नोटिसींची भीती वाटत नाही. अशा अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या आहेत. त्यामुळं त्या ईडी (ED Office) कार्यालयात जातील.' नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald case) ईडीनं सोनिया गांधी यांना समन्स बजावलं असून, त्यांना 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलंय. (ED Summons to Sonia Gandhi)

प्रकृती अस्वास्थ्यामुळं सोनिया गांधी यापूर्वी ईडीच्या कार्यालयात जाऊ शकल्या नाहीत, त्यांना 8 जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. पण, त्यावेळी सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ईडीला या संपूर्ण प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे जबाब नोंदवायचे आहेत. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांची ईडीनं अनेकवेळा चौकशी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT