Congress took an important decision for the assembly member of parliament will not get ticket in vidhansabha election haryana  sakal
देश

Congress Assembly Elections: विधानसभा जिंकण्यासाठी काँग्रेसने घेतला मोठा निर्णय, 'या' नेत्यांचा पत्ता केला कट !

Latest Desh News: गेल्या १० वर्षांपासून हरियानात सत्तारुढ भाजपच्या विरोधात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Political News: आगामी हरियाना विधानसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे काँग्रेसच्या छाननी समितीने स्पष्ट केले. यामुळे खासदार कुमारी शैलजा यांच्या तयारीवर पाणी फेरले गेले आहे. येत्या १ ऑक्टोबरला हरियानामध्ये मतदान होणार आहे.

यासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी छाननी समितीची बैठक पार पडली. हरिरयानासाठी छाननी समितीचे अध्यक्षपद खासदार अजय माकन यांच्याकडे आहे. या समितीमध्ये हरयाणाचे प्रभारी दीपक बाबरिया, प्रदेशाध्यक्ष उदय भान उपस्थित होते. गेल्या १० वर्षांपासून हरियानात सत्तारुढ भाजपच्या विरोधात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित आहे.

काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण दिसत असल्याने निवडणुकीच्या आधीपासून हरियानातील दोन गटामध्ये नेतृत्वावरून धुमश्चक्री सुरू आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा व सिरसा मतदारसंघातून निवडून आलेल्या कुमारी शैलजा यांच्यातील गटबाजी समोर येत आहे. कुमारी शैलजा यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे इच्छा व्यक्त केली आहे.

परंतु खासदारांना उमेदवारी मिळणार नसल्याचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी स्पष्ट केले. शैलजा यांच्याप्रमाणे खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. परंतु या दोन्ही नेत्यांना विधानसभा लढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. हरियानातून काँग्रेसचे पाच खासदार निवडून आले आहेत. यात शैलजा व दीपेंद्र हुडा यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT