देश

सिद्धरामय्याच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी काँग्रेसची मागणी

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत असतानाच सिद्धरामय्यांच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी काँग्रेस आमदारांतून होऊ लागली आहे.

चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर यांनी सोमवारी (ता. ६) तशी अपेक्षा व्यक्त करून पक्षश्रेष्ठींनी युतीचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. मंगळवारी (ता. ७) गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी ही मागणी उचलून धरली आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर युती सरकारचे पतन होणार आहे. काँग्रेस युती सरकारमधून बाहेर पडणार आहे, अशा चर्चा होत आहेत. त्यातच आता सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी पुढे आल्याने मित्रपक्ष धजदमध्ये खळबळ उडाली आहे.

सिध्दरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना चांगले काम केले आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास माझा संपूर्ण पाठिंबा आहे. दुसऱ्या टर्ममध्येही तेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. परंतु, जनतेच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे, असे बंगळुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी सांगितले.

आमदार व मंत्र्याच्या या मागणीमुळे निकालानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघण्याची दाट शक्‍यता आहे. युती टिकण्याची शक्‍यताही कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे. धजदसोबत गेल्याने काँग्रेसच्या प्रतिमेला धक्‍का पोचला आहे. त्यामुळे, युतीतून बाहेर पडून नव्याने निवडणुकीला सामोरे जाऊया, अशी मागणी काँग्रेसचे काही आमदार करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला १३ पेक्षा अधिक जागा मिळाल्यास काँग्रेस आमदारांची मागणी पुन्हा उचल घेईल. त्यामुळे, धजदला एकतर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल किंवा मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागेल. कमी जागा मिळाल्या तर परिस्थिती जैसे थे ठेवून कार्यकाळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

‘धजद’चे सूचक मौन
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत तटस्थ राहण्याच्या सूचना धजदचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. राज्याच्या व देशाच्या राजकारणात काही घडामोडी घडल्यास प्रतिक्रीया न देता मौन बाळगून प्रतीक्षा करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच सध्या नगर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीकडे अधिक लक्ष देण्यास त्यांनी नेत्यांना सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT