P. Chidambaram  sakal
देश

P. Chidambaram : काँग्रेसला २०१९ च्या तुलनेत जास्त जागा मिळतील ; चिदंबरम

पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘हिंदू धर्म किंवा हिंदूंना कोणताही धोका नव्हता

सकाळ डिजिटल टीम

कोलकता ः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २०१९ च्या तुलनेत जास्त जागा मिळतील, असा दावा करीत तमिळनाडू आणि केरळमध्ये ‘इंडिया’ आघाडी दणदणीत विजय मिळवेल, असे भाकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केले. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘हिंदू धर्म किंवा हिंदूंना कोणताही धोका नव्हता. ‘हिंदूंचे तारणहार’ अशी मोदी यांची प्रतिमा उभी करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष हिंदूविरोधी असल्याचे चित्र निर्माण करणे ही भाजपने आखलेली रणनीती होती.

’’ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या निवडणुकीत ‘मुख्य खेळाडू’ असून राज्यात सत्ता राखण्याची त्यांची क्षमता ‘इंडिया’ आघाडीला बळकट करेल, असे त्यांनी सांगितले. चिदंबरम म्हणाले की, मी सर्व राज्यांबाबत सांगू शकत नाही.पण तमिळनाडूमध्ये ‘इंडिया’ दणदणीत विजयाची नोंद करेल, असा अंदाज मी निश्‍चितपणे व्यक्त करू शकतो. खात्रीने सांगू शकत असा मी आत्मविश्वासाने अंदाज बांधू शकतो.

केरळात दोन आघाड्या (यूडीएफ आणि एलडीएफ) हे २० जागा मिळवतील. तेथे भाजपला काही मिळणार नाही. कर्नाटक आणि तेलंगणमध्ये काँग्रेसची सरकारे लोकप्रिय आहेत आणि २०१९ च्या तुलनेत काँग्रेसला जास्त जागा मिळतील. त्यावेळी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT