देश

'पत्नी महिन्यातून फक्त दोन वेळा भेटायला येते'; शारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी पती कोर्टात

शारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी एक प्रकरण गुजरात हायकोर्टात गेलं आहे. नोकरीच्या निमित्ताने पतीपासून दूर राहणाऱ्या महिलेने हायकोर्टात धाव घेतली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- शारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी एक प्रकरण गुजरात हायकोर्टात गेलं आहे. नोकरीच्या निमित्ताने पतीपासून दूर राहणाऱ्या महिलेने हायकोर्टात धाव घेतली आहे. महिन्यातीत दोन साप्ताहिक सुट्ट्या पतीसोबत घालवल्याने वैवाहिक कर्तव्य पूर्ण होत नाही का? अशी विचारणा महिलेने केली आहे. विशेष म्हणजे पतीने याआधी आपल्या पत्नीविरोधात फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती.

महिलेच्या पतीने हिंदू वैवाहिक कायदा कलम ९ अंतर्गत शारीरिक संबंधांच्या अधिकारासाठी सुरतच्या फॅमिली कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती. पत्नीने आपल्या जवळ येऊन राहावे यासाठी कोर्टाने आदेश द्यावे अशी मागणी पतीने केली होती. सदर जोडप्याला एक लहान मुल देखील आहे.(conjugal rights husband reach court for weekend wife meet only two times in month)

पतीने याचिकेत म्हटलंय की, त्याची पत्नी त्याच्यासोबत दररोज राहत नाही. मुलाच्या जन्मानंतर ती नोकरीच्या निमित्ताने आपल्या आई-वडिलांजवळ राहते. पत्नी केवळ महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या हफ्त्यात त्याला भेटायला येते. इतरवेळी ती आपल्या आई-वडिलांसोबत पाहते. पत्नी मुलाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून वैवाहिक अधिकारांपासून मला वंचित ठेवत नोकरी करत आहे.

पतीची याचिका रद्द करावी यासाठी महिलेने हाय कोर्टात धाव घेतली. पतीने दाखल केलेली याचिका चालवण्या योग्य नाही असं महिलेनं म्हटलं. पत्नीने म्हटलं की, 'ती महिन्यातील दोन दिवस नियमित पद्धतीने पतीच्या घरी जाते. पती दावा करतोय की त्याने मला सोडलं आहे.' कोर्टाने महिलेची मागणी फेटाळली आहे. तसेच याप्रकरणी सुनावणीची आवश्यकता असल्याचं म्हटलं.

महिलेच्या वकीलाकडून कोर्टात दावा करण्यात आलाय की, हिंदू विवाह कायद्याच्या कलम ९ नुसार पती-पत्नी वेगळे झाले असते तरच त्यांना वैवाहिक कर्तव्य पूर्ण करण्यास सांगितले जाऊ शकते. पत्नी दर दुसऱ्या आठवड्यात पतीला भेटण्यासाठी जाते. त्यामुळे ते वेगळे झालेत असं म्हणता येत नाही. दरम्यान, कोर्टाने २५ जानेवारीपर्यंत पतीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT