constable fake caste certificate  
देश

नोकरीसाठी जात चोरली, निवृत्तीला 2 दोन वर्ष शिल्लक असताना समोर आलं सत्य; कोर्टात किती झाली शिक्षा?

constable fake caste certificate : मध्य प्रदेश पोलिसांत काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 41 वर्षांपूर्वी नोकरीवर रुजू होताना त्यांने बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाले आहे.

रोहित कणसे

मध्य प्रदेश पोलिसांत काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 41 वर्षांपूर्वी नोकरीवर रुजू होताना त्यांने बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाले आहे. नोकरीसाठी दुसऱ्या जातीचे प्रमाणपत्र मिळवून तो आरक्षण कोट्यातून पोलिस दलात दाखल झाला होता. महत्वाचे म्हणजे दोषी हवालदाराच्या निवृत्तीला फक्त दोन वर्षे उरली होते.

मिडीया रिपोर्ट्सनुसार, सत्यनारायण वैष्णव असे दोषी हवालदाराचे नाव आहे. ऑगस्ट 1983 मध्ये ते पोलिसात आपक्षक म्हणून भरती झाले. तेव्हा ते अवघ्या 19 वर्षांचे होते. 23 वर्षांनंतर म्हणजेच मे 2006 मध्ये इंदूरच्या छोटी ग्वालटोली पोलीस ठाण्यात सत्यनारायण बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करत असल्याची तक्रार आली होती.

आरक्षणासाठी सत्यनारायण यांनी कोरी जातीचे असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते, मात्र ते ब्राह्मण आहेत, असा आरोप करण्यात आला. तक्रारीच्या आधारे कॉन्स्टेबलविरुद्ध भादंवि कलम 420, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस तपासात काय समोर आलं

या प्रकरणात पोलिसांचा तपास सहा वर्षे चालला. त्यानंतर सत्यनारायण यांनी नोकरीसाठी बनावट प्रमाणपत्र बनवल्याचे समोर आले. आता न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाचे चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप सिंग यांनी सत्यनारायण यांना दोन कलमांतर्गत 20 वर्षे आणि उर्वरित दोन कलमांतर्गत प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर चार हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT