Gujrat High Court_Mandir Construction 
देश

Temple Construction: मंदिरं उभारणं हा सार्वजनिक जमिनी बळकावण्याचा दुसरा मार्ग - हायकोर्ट

रस्त्यांच्या बाजुला, चौकाचौकात आधी छोटी नंतर मोठी झालेली मंदिरं आपण नेहमीच पाहतो. पण या कुठल्या जागा असतात जिथं ही मंदिरं उभारली जातात.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : रस्त्यांच्या बाजुला, चौकाचौकात आधी छोटी नंतर मोठी झालेली मंदिरं आपण नेहमीच पाहतो. पण या कुठल्या जागा असतात जिथं ही मंदिरं उभारली जातात. याबाबत गुजरात हायकोर्टानं एक महत्वाची टिप्पणी केली आहे.

"मंदिरं उभारणं हा भारतात सार्वजनिक जमिनी बळकावण्याचा दुसरा मार्ग आहे," असं कोर्टानं म्हटलं आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. (construction of temples is another way of grabbing public land syas gujrat high court)

गुजरात हायकोर्टात अहमदाबादमधील स्थानिक लोकांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटलं होतं की, टाऊन प्लॅनिंग सार्वजनिक रस्ता बनवण्यासाठी मंदिर पाडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

यावर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावर मुख्य न्यायाधीश सुनीता अगरवाल यांनी म्हटलं की, अशा प्रकारे लोक सर्वांना भावनिक ब्लॅकमेल करतात. मंदिरं उभारणं हा भारतात सार्वजनिक जमिनी बळकावण्याचा दुसरा पर्याय आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणात ९३ घरांमधील लोकांनी या भागातील टाऊन प्लॅनिंगनुसार होत असलेल्या रस्त्याला विरोध केला आहे. यावेळी न्यायमूर्तींनी या रस्त्याच्या कामाला दिलेलं आव्हान फेटाळून लावलं. यावेळी महापालिकेनं कोर्टात सांगितलं की, या टाऊन प्लॅनिंगमध्ये एकाही व्यक्तीचं घर पाडलं जाणार नाही. (Latest Maharashtra News)

पण स्थानिक नागरिक प्रस्तावीत रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या मंदिराच्या बचावासाठी पुढे आले आहेत. हे मंदिर आम्ही वर्गणी गोळा करुन बांधलं असल्यानं त्याच्याशी आमची भावनिकता जोडली असल्याचं या नागरिकांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

न्यायमूर्तींनी पुढे म्हटलं की, ज्या जागेवर मंदिर उभारण्यात आलं आहे ती जागा याचिकार्त्यांच्या मालकीची जागा नाही. पण आता मंदिर पाडलं जात असताना ते भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत आहात. तुमच्या घरातील एका खोलीत मंदिर उभारा अन्यथा मंदिर पाडलं जाईल, असा अंतरिम आदेश यावेळी कोर्टानं देताना मंदिराला तात्पुरतं संरक्षण दिलं आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १४ मार्च रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT