Construction Sector Jobs eSakal
देश

Construction Sector Jobs : भारतातील बांधकाम क्षेत्रात 2030 सालापर्यंत असतील 10 कोटींहून अधिक नोकऱ्या; रिपोर्टमध्ये दावा

India Construction Sector : देशात कुशल कामगारांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

Sudesh

Employment News : देशातील बांधकाम क्षेत्रामध्ये 2030 सालापर्यंत 10 कोटींहून अधिक नोकऱ्या उपलब्ध असतील, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. नाईट फ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स (RICS) या संस्थांनी संयुक्तपणे हा रिपोर्ट सादर केला आहे.

बांधकाम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र आहे. सध्या या क्षेत्रात 7.1 कोटींहून अधिक कामगार आहेत. ही संख्या 2030 सालापर्यंत 10 कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

एक ट्रिलियनचं होणार क्षेत्र

भारतातील बांधकाम क्षेत्राचं मूल्य सध्या 650 बिलियन डॉलर्स एवढं आहे. हे 2030 सालापर्यंत वाढून 1 ट्रिलियन डॉलर्स एवढं होईल, अशी शक्यताही या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. हा आकडा आणखी वाढवायचा असेल, तर देशात कुशल कामगारांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. (National News)

81 टक्के कामगार अकुशल

सध्या उपलब्ध असणाऱ्या 7.1 कोटी कामगारांपैकी तब्बल 81 टक्के कामगार हे अकुशल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तर, केवळ 19 टक्के कामगार हे कुशल आहेत. डेव्हलपर्स आणि कंस्ट्रक्शन कंपन्यांकडून कुशल कामगारांची मागणी केली जात आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने, शैक्षणिक संस्थांनी आणि प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या आकडेवारीनुसार, तयार होणाऱ्या एकूण कामगारांपैकी (कुशल आणि अकुशल) 87 टक्के कामगार हे रिअल इस्टेट क्षेत्रात भरती केले जातात; तर उरलेले 13 टक्के कामगार हे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात जातात.

कौशल्य प्रशिक्षणाची गरज

सध्या बांधकाम क्षेत्रातील 7.1 कोटी कर्मचाऱ्यांपैकी 44 लाख कर्मचारी हे कुशल तंत्रज्ञ आहेत. यामध्ये इंजिनिअर, टेक्निशिअन आणि क्लार्क यांचा समावेश आहे. तर 69 लाख कामगारांना व्होकेशनल प्रशिक्षण मिळालं आहे. बाकी सर्व कामगारांना कसलंही प्रशिक्षण मिळालेलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात अधिक प्रगतीसाठी कामगारांना प्रशिक्षण देण्याची गरज या अहवालात व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Maharashtra Dry Day: महाराष्ट्रात २५ जुलैला खरंच 'ड्राय डे' आहे का? आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाचा निर्णय काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार

'वास्तू बदललं की नशीब बदलतं?' अन्नू कपूरच्या नव्या चित्रपटात उलगडणार अनोखं सत्य

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

SCROLL FOR NEXT