new delhi sakal
देश

गूगलकडून ग्राहकांच्या तक्रारीची दखल; ९५ हजार ‘पोस्ट’ केल्या डिलीट

आतापर्यंत ५,७६,८९२ मजकूर हटवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

नवी दिल्ली : आघाडीची सर्च इंजिन कंपनी गूगलने जुलै महिन्यांत ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत तब्बल ९५,६८० प्रकारचे मजकूर वगळल्याची माहिती आज देण्यात आली. गूगलने आज जारी केलेल्या मासिक अहवालात म्हटले की, जुलै महिन्यांत यूजरकडून विविध मजकूराबाबत ३६,९४३ तक्रारी आल्या आणि याच्या आधारावर ९५,६८० मजकूर (कंटेंट) वगळण्यात आले. गूगलच्या ग्राहकांव्यतिरिक्त स्वंचलित शोधाद्वारे आतापर्यंत ५,७६,८९२ मजकूर हटवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

अमेरिकी कंपनी गूगलने भारताला आयटी नियमातंर्गत दिली आहे. (National News)

हे नियम २६ मे पासून लागू करण्यात आले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गूगलने म्हटले की, भारतात व्यक्तिगत रूपाने वापरणाऱ्या ग्राहकांकडून ३६,९३४ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीचा विचार करत आक्षेपार्ह मजकुराची संख्या ९५,६८० एवढी होती आणि ती आतापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. गूगलला जून महिन्यात ३६,२६५ तक्रारी मिळाल्या होत्या आणि त्यानुसार ८३,६१३ मजकूर वगळण्यात आला. एप्रिल महिन्यांत ५९,३५० मजकूर आणि मे महिन्यात ७१,१३२ मजकूर काढून टाकण्यात आला. गूगलवरून तक्रारीच्या आधारावर अनेक श्रेणीतील मजकूर काढून टाकण्यात आले. या श्रेणीत कॉपीराइट (९४,८६२), ट्रेडमार्क (८०७) आणि न्यायालयीन आदेश (४), फसवणूक (३), बनावट (१) आदीचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT