Sonia Gandhi 
देश

...तोपर्यंत भाजपवर दबाव निर्माण करा; सोनिया गांधींचा सल्ला

नामदेव कुंभार

देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या संथ गतीवरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेस कमिटीच्या ऑनलाइन बैठकीनंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलेच, त्याशिवाय काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपविरोधात लढण्याचा सल्लाही दिला. वरिष्ठ नागरिकांचं दररोज होणारं लसीकरण तीनपटीने वाढवण्याची गरज असल्याचंही यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या.

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, तयारीची गरज आहे. तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याचीही गरज असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या. यावेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपाच्या विरोधात आक्रमक पवित्रा धारण करण्याचा सुचना दिल्या आहे. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीचं दररोजचं प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या 75 टक्केंपर्यंत जात नाही, तोपर्यंत आंदोलन करा, असा सल्ला सोनिया गांधी यांनी दिला आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत संपूर्ण देशाचं लसीकरण होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. कोरोना काळात नागरिकांची मदत करण्याचं आव्हानही सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आहे.

लसींबद्दल लोकांमध्ये असणाऱ्या अफवा दूर करा. लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करा, असाही सल्ला कार्यकर्त्यांना सोनिया गांधी यांनी दिला आहे. देशाच्या लसीकरणात काँग्रेसचा वाटा महत्वपूर्ण असावा. देशातील प्रतिदिवस कोरोना लसीचं प्रमाण 75 टक्केंपर्यंत जात नाही, तोपर्यंत सर्व प्रयत्न करा. लोकांमधील गैरसमज दूर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT