controversy over rahul gandhi cutout rajeev chandrasekha said insult to flag code bharat Jodo yatra  
देश

Rahul Gandhi : राहुल गांधीकडून तिरंग्याचा अपमान? कटआऊटच्या उंचीवरून केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज सांगता झाली आहे, याच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी लाल चौक येथे तिरंगा फडकवला होता. या ध्वजारोहणावरून आता नवा वाद पेटला आहे. भाजपकडून राहुल गांधी यांनी ध्वज संहितेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

लाल चौक येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत, यामध्ये राहुल कांधी यांचं कटआऊट तिरंग्याहून वर असल्याचे दिसत आङे. यावरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांनी स्वतःचा कटआऊट लावून ध्वजारोहण केल्याचे म्हटले आहे.

हे राजवंशची मानसीकता दाखवतं. त्यांच्यासाठी स्वतःचा फोटो, त्यांची आजी-आजोबांचा फोटो तसेच त्यांच्या नावावर सुरू असलेल्या योजना सर्व राष्ट्रध्वजापेक्षा मोठं आहे. जर मी असं काही केलं असतं तर मला लाज वाटेल. पण मला वाटतं की घराणेशाही ही त्यांच्या डीएनएमध्ये आहे. जेव्हा तुम्ही ध्वजारोहण करता तेव्हा देखील तुम्ही त्याला खाली दाखावू इच्छीता आणि ध्वजाच्या मागे स्वतःचे कटआऊट लावून ध्वज संहितेचे उलंघन करता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बॅंकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शेतकऱ्याने जीवन संपवल्यास जबाबदार धरणार

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

ढिंग टांग : गर्रर्र...गर्रर्र...गर्जना!

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT