देश

स्वयंपाकाचा गॅस आता महागला 

पीटीआय

नवी दिल्ली (पीटीआय) : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारपासून वाढ झाली आहे. स्वयंपाकाची अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 502.4 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत विनाअंशदानित गॅस सिलिंडरचा दर 59 रुपयांनी वाढला आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले भाव आणि परकी चलन विनिमय दरातील चढउतार यामुळे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिली. अंशदानित गॅस सिलिंडरची दरवाढ प्रामुख्याने वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) झालेली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विनाअंशदानित गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना मिळणारे अंशदान सप्टेंबरमध्ये प्रतिसिलिंडर 320.49 रुपये होते. ते ऑक्‍टोबरमध्ये 376.60 रुपये झाले. एलपीजी दरवाढ करताना ग्राहकांवर त्याचा फारसा बोजा पडू नये, याची काळजी घेण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT