देश

सहकार मंत्रालयाची स्थापना का केली? मोदींनी केला उलगडा

सकाळ वृत्तसेवा

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्र सरकाने सहकार मंत्रालयाची नव्याने निर्मिती केली. या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे राज्यातील सहकाराशी संबंधित उद्योगांवर पकड असलेल्या पक्षांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर विविध स्तरातून प्रतिक्रियाही येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सहकार मंत्रालयाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. सहकारवादाचं सशक्तीकरण व्हावं म्हणून विशेष मंत्रालय स्थापन केल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना सहकार मंत्रालयाबाबत भाष्य केलं. सहकारवाद ही आपली प्रेरणा आहे. सहकारवाद आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक आहे. सहकारवादाचं सशक्तीकरण व्हावं म्हणून विशेष मंत्रालय तयार करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त बळ देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे, असे मोदी यांनी सांगितलं.

‘सहकार से समृद्धी’ असे या सहकार मंत्रालयाचे बोधवाक्य आहे. 97 व्या घटनादुरुस्तीनंतर पहिल्यांदाच केंद्र सरकारने सहकार क्षेत्रासाठी मंत्रालयाची स्थापना केली आहे. या खात्याची जबाबदारी अमित शाह यांच्या खांद्यावर सोपवली आहे. आमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा दिला. तसेच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी रोजगार निर्मितीसाठी पॅकेज आणि नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली. तसेच गरिबांसाठी मोफत तांदूळ, भविष्यातील वाटचाल, शिक्षण योजना अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आपल्या भाषणात केला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT