Kamal Nath
Kamal Nath 
देश

कमलनाथ यांच्यावर सुरक्षा रक्षकाने रोखली बंदूक

वृत्तसंस्था

छिंदवाडा - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर सुरक्षा रक्षकानेच बंदूक रोखल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

छिंदवाडाचे खासदार असलेले कमलनाथ शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आले होते. तेथून ते रात्री पुन्हा दिल्लीला रवाना होण्यासाठी निघाले. त्यांच्या विमानात ते चढत असताना सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर बंदूक रोखली. त्यावेळी त्याच्या शेजारी असलेल्या जवानांनी त्याला पकडले आणि त्याच्याजवळील बंदूक ताब्यात घेतली. रत्नेश पवार असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, त्याने असे कृत्य कोणत्या कारणाने केले याची चौकशी करण्यात येत आहे.

छिंदवाडाचे पोलिस उपमहानिरीक्षक जी. के. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा जवान रत्नेशला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नेशची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, त्याच्या कुटुंबीयांबाबतही चौकशी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार X Factor? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

SCROLL FOR NEXT