Coromandel Express Accident  
देश

Coromandal Express: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातात ५० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भुवनेश्वर: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातात ५० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सुमारे २०० जण जखमी झाले आहेत. या अपघातात बचाव कार्य सुरु असून याला अनेक तासांचा कालावधी लागू शकतो. यापार्श्वभूमीवर या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. (Coromandal Express accident Several trains cancelled while some are diverted)

ज्या गाड्या रद्द आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत, याची सविस्तर माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे. यामध्ये अनेक मेल गाड्या आणि एक्सप्रेसचा समावेश आहे. (Train Accident latest News)

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी अपघाताच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली असून उद्या ते घटनास्थळी भेट देणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली असून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये तर गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या लोकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण आहे की, रेल्वेचे अनेक डब्बे अक्षरशः कापले गेले आहेत. दोन एक्सप्रेस आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. सुरुवातीला एक ट्रेन रुळावरुन घसरली त्यानंतर त्यावर दुसरी गाडी आदळली आणि त्यांना दुसऱ्या रुळावरुन धावणारी मालगाडी धडकली, अशी माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT