Manish Sisodia esakal
देश

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकानंतर उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; सिसोदिया म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

'गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कोरोना महामारीशी लढत आहोत.'

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा (Coronavirus) वेग झपाट्यानं वाढू लागलाय. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील 1,729 वर पोहोचलीय. तर, दैनंदिन संसर्ग दर 7.72 टक्के नोंदवला गेलाय. अशा परिस्थितीत कोरोना (Coronavirus in Delhi) आता अधिक वेगानं वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारही (Delhi Government) या वाढत्या प्रकरणांबाबत पूर्णपणे सतर्क झालं असून आगामी काळात गरज पडल्यास कठोर पावलं उचलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कोरोना महामारीशी लढत आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढला तर आगामी काळात गरज पडल्यास आणखी कठोर पावलं उचलली जातील, असे त्यांनी संकेत दिलेत. आता दररोज 100 च्या खाली नोंद झालेल्या कोरोना बाधितांची संख्या 500 हून अधिक नोंदवली जात आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात त्यांची संख्या झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे.

सध्या सरकारकडून दररोज 10 ते 12 हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास बाधित लोकांचा शोध घेता यावा यासाठी सरकारला दैनंदिन चाचणी संख्या वाढवावी लागेल. तर, दुसरीकडं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देखील कोरोनाबाबत घाबरण्याची गरज नसल्याचं सांगत आहेत. सिसोदिया पुढं म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सतर्क रहायला हवं. सध्या रुग्णालयात फारसे रुग्ण नाहीत, त्यामुळं फार त्रासाची बाब नाहीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) 20 एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT