Mask Mandatory in Punjab
Mask Mandatory in Punjab Sakal
देश

यूपी, दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्क सक्ती

सकाळ डिजिटल टीम

Mask Mandatory in Punjab: भारतात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्टवर आलेल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचा करण्यात आला आहे.

या ठिकाणी असेल मास्क सक्ती-

  • सार्वजनिक वाहतूक उदा. बस, ट्रेन, विमान, ट्रक्सी इत्यादीमधून प्रवास करताना मास्क सक्तीचा करण्यात आला आहे.

  • सिनेमागृह, मॉल्स तसेच दुकांने यांमध्येही मास्क घालणं सक्तीचे करण्यात आलं आहे.

  • शाळा, कार्यालये तसेच इतर बंदिस्त ठिकाणी गर्दीची जमेल अशा ठिकाणी मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशातही मास्क सक्ती-

उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी राजधानी लखनऊ आणि एनसीआरमधील सहा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे अनिवार्य केले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा परिणाम राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (National Capital Region) अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांवर झाला आहे. एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, हे लक्षात घेऊन सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि राजधानी लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

दिल्लीतही मास्क सक्ती?

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या (Delhi Corona Cases) पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मास्क (Delhi Mask Mandatory) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या पाच राज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग कुठेही पसरू नये यासाठी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गरज भासल्यास कठोर पावले उचलण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT