कोरोना रुग्ण वाढतेय, दिल्लीत मास्क लावणं अनिवार्य?

Delhi Corona Cases
Delhi Corona CasesSakal

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या (Delhi Corona Cases) पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मास्क (Delhi Mask Mandatory) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Delhi Corona Cases
'जहांगीरपुरीतील कारवाई तत्काळ थांबवा', SC चा दिल्ली महापालिकेला दणका

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी शाळा अद्याप बंद होणार नाही. शाळांसाठी तज्ज्ञांशी बोलून मार्गदर्शक तत्व जारी केले जातील. यासोबत कोरोना चाचण्या देखील करण्यात येतील. लसीकरणाचा वेग वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाहीतर मास्क लावणे पुन्हा अनिवार्य करण्यात आले. मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्याच वेळी, त्यांनी मास्कसाठी दंड आकारण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते.

केंद्र सरकारने मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या पाच राज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग कुठेही पसरू नये यासाठी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गरज भासल्यास कठोर पावले उचलण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली आणि चार राज्यांना “चाचणी, ट्रेसिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड या पंचसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या पत्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. कोरोनाच्या बाबतीत हलगर्जी करू नका. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये यासाठी काळजी घ्या, असं या पत्रात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com