covid 19 patients 
देश

Corona Updates: देशातील बाधितांचा आकडा 91 लाखांच्या पार

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील 4-5 दिवसांपासून प्रतिदिन रुग्णवाढ 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 44 हजार 059 रुग्णांचे निदान झाले असून 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या अगोदर कोरोनाचे रुग्णवाढ कमी झाली होती. प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली गेली होती. 

आतापर्यंत देशात 91 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 33 हजार 738 वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या 91 लाख 39 हजार 866 झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 43 हजार 486 रुग्ण उपचार घेत आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 85 लाख 62 हजार 642 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत 41 हजार 24 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे पण कोरोना रुग्णांचा प्रसार वाढतच आहे.

रविवारी देशात कोरोनाच्या 8 लाख 49 हजार 596 चाचण्या पार पडल्या आहेत. तर आतापर्यंत 13 कोटी 25 लाख 82 हजार 730 चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT