beed corona updates beed corona updates
देश

चिंता वाढली! 113 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद; 24 तासांत एका रुग्णाचा मृत्यू

भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

रुपेश नामदास

Covid 19 Update In India: भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी (१२ मार्च) देशात कोरोनाच्या ५२४ रूग्णांची नोंद झाली आहे. 113 दिवसांनंतर प्रथम ऐवढ्या रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता 3,618 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, आत्ता पर्यंत एकूण मृतांची संख्या 5,30,781 झाली आहे. संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 4.46 कोटी (4,46,90,492) झाली आहे. तर आत्ता पर्यंत 98.80 टक्के लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 4,41,56,093 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचा दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने शनिवारी काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात हळूहळू वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

भारतात देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन निती आयोगाच्या वतीने करण्यात आलं आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP AB Form Controversy: नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, Video पाहा...

Sangli Crime News ‘दारात उंदीर का सोडलास?’ शेजाऱ्यांनी पती-पत्नीलाच चोपलं, अन्...

Latest Marathi News Live Update : आपच्या शहराध्यक्षाचा सायकल वरून येऊन निवडणुक अर्ज दाखल

New Labour Code : आता कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताच मिळणार ग्रेच्युटी! नवीन कामगार कायद्यात नेमका काय बदल झाला?

स्टार प्रवाह कँडी क्रश खेळतंय का? नवी मालिका 'तुझ्या सोबतीने'ची वेळ पाहून प्रेक्षक चक्रावले; म्हणतात- अत्यंत घाईत...

SCROLL FOR NEXT