Crime Sakal
देश

कोरोनामुळे नोकरी गेली अन् मोबाईल चोरी सुरू केली; पोलिसांकडून अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधाराने तपास केल्यावर ३७ वर्षाच्या अस्लमला अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आणली आहे. त्यानंतर अनेक जणांचे संसार आणि जनजीवन सुरळीत व्हायला वेळ लागला आहे. दिल्लीतील अशाच एका व्यक्तीने कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे मोबाईल चोरीचा व्यवसाय सुरू केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. सदर व्यक्ती दिल्लीतील नानग्लोई भागात राहणारा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(Crime News Updates)

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव अस्लम असं असून त्याच्याकडून तीन मोबाईल आणि एक स्कूटर जप्त करण्यात आली आहे. "3 जूनला एका व्यक्तीचा फोन चोरीला गेल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तक्रार करणाऱ्या महिलेने सागितलं की, मी किराणा दुकानातून सामान घेऊन येत असताना एकाने माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि नानग्लोईच्या दिशेने निघून गेला." असं तक्रार करणाऱ्या महिलेने सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधाराने तपास केल्यावर ३७ वर्षाच्या अस्लमला अटक केली आहे. त्यानंतर त्याच्याकडे सापडलेला मोबाईल हा सदर महिलेचा असलेला पोलिसांना आढळला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी करत असताना त्याने कोरोना काळात त्याची नोकरी गमावल्याचं सांगितलं आहे. नोकरी गमावल्याने तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्याचबरोबर पैशांची चणचण भासू लागल्याने त्याने मोबाईल चोरी सुरू केल्याचं सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT