Corona-Virus 
देश

पुण्याहून कोरोनाचा रुग्ण पोचला ‘यूपी’तील गावी; आणि...

मतेंद्र कीर्ती

प्रतापगड (उत्तर प्रदेश) - प्रतापगड जिल्ह्यातील गुडरु गावातील मूळचा रहिवासी विकास शर्मा (वय ३५) हा पुण्याहून गावी गुरुवारी (ता. २३) परतला. त्यानंतर दोन दिवसांनी तो तापाने फणफणला. तपासणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विकास शर्मा हा पुण्यात एका खासगी कंपनीत उत्पादन व्यवस्थापक आहे. ताप आल्याने तो चिंचवडमधील खासगी प्रयोगशाळेतून त्याने कोरोनाची चाचणी केली. त्यात विकासला कोरोना झाल्याचे निदान गेल्या बुधवारी (ता. २२) झाले. यानंतर तो विमानाने लखनौला आला आणि तेथून बसने गुडरु या त्याच्या गावी पोचला. तो घरात विलगीकरणात होता. मात्र कोरोनाबाधित असल्याची माहिती त्याने दिली नव्हती. 

विकासची तब्येत बिघडल्याने आरोग्य पथक त्याच्या घरी पोचले. तो कोरोनाबाधित असल्याने त्यानंतर समजले. पुण्यापासून प्रतापगडपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे.
- अरविंद श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्रतापगड

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rainfall Update : पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात २४ तासांत लक्षणीय वाढ; पावसाचा जोर कायम

शेअर बाजार : फिनिक्स मिल (शुक्रवार भाव बंद : रु. २०४७.६०)

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला ! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

अर्थभान : पगारात भागत नाही!

आजचे पंचांग आणि दिनविशेष -०६ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT