indian corona updates 
देश

Corona Updates: दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाने चांगलाच जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्या दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशातील उत्तरी राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्य सरकारने लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत वाढवले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही राज्य सरकारने केले आहे.

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 41 हजार 810 रुग्णांचं निदान झालं असून 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतची बाधितांची संख्या 93 लाख 92 हजार 920 वर गेली आहे. सध्या देशात कोरोनावर 4 लाख 53 हजार 956 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून आतापर्यंत 1 लाख 36 हजार 696 कोरोना (COVID19) रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 88 लाख 2 हजार 267 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत कोरोनाचे 42 हजार 298 रुग्णांना डिस्चार्ज (new discharges) दिला आहे. देशातील रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी वाढणारे कोरोना रुग्ण चिंता वाढवणारे आहेत. मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

भारतात कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवल्याने आता रुग्णांचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 12 लाख 83 हजार 449 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 13 कोटी 95 लाख 3 हजार 803 चाचण्या पार पाडल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT