today corona 
देश

Corona Updates: कोरोनाची रिकव्हरी 93 टक्क्यांच्या पुढे; 24 तासांत रुग्णवाढीत घट

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: दिवाळीनंतर देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 37 हजार 975 रुग्णांचं निदान झालं असून 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 91 लाख 77 हजार 841 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली आहे तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 34 हजार 218 झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सध्या देशात कोरोनावर 4 लाख 38 हजार 667 जण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 86 लाख 4 हजार 955 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर मागील 24 तासांत 42 हजार 314 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 93.76% (86,04,955)
कोरोनाचे सक्रिय रग्ण- 4.78% 
कोरोनाने मृत्यू झालेल्यांची टक्का- 1.46%

देशात दिल्लीत होत असणाऱ्या चाचण्यांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न केला होता. कारण देशात बऱ्याच ठिकाणी कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचं दिसलं होतं. त्यामुळे मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांत मोठी वाढ दिसली होती. 

सोमवारी देशात कोरोनाच्या 10 लाख 99 हजार 545 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 13 कोटी 36 लाख 82 हजार 275 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

कोकणात 'या' ठिकाणी झालंय 'विसरू नको तू मला' या मालिकेचं शूटिंग; भारावलेला शाल्व म्हणाला, 'इथे फक्त फिरायला आलेलो पण...'

Jio, Airtel, Vi की BSNL...कोणतं सिमकार्ड आहे बेस्ट? 'ही' कंपनी देते जास्त ऑफर्स अन् जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स, नेटवर्कही एकदम टॉप

SCROLL FOR NEXT