Report sakal
देश

Corona Report: कोरोना शोधनिबंधांचा तोल ढासळला

वैश्‍विक साथ ही केवळ आजाराची नसते, तर ती चुकीच्या माहितीचीसुद्धा असते. या उक्तीची प्रचिती कोरोनाकाळातील शोधनिबंधांहून आली आहे.

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैश्‍विक साथ ही केवळ आजाराची नसते, तर ती चुकीच्या माहितीचीसुद्धा असते. या उक्तीची प्रचिती कोरोनाकाळातील शोधनिबंधांहून आली आहे. घाईघाईत आणि अपुऱ्या नमुन्यांच्या आधारे लिहिलेले तब्बल ४६ शोधनिबंध कोरोनाकाळातील पाच महिन्यांत मागे घेण्यात आले आहे. साथीच्या काळात चुकीच्या निष्कर्षांमुळे संशोधन तर दिशाहीन होते, त्याचबरोबर सर्वसामांन्यावरही त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. (Corona Research Report)

कोरोना विषाणूच्या वैश्‍विक प्रसाराबरोबरच जगभरात वैद्यक संशोधनाला गती मिळाली. त्याचा फायदाही लशीच्या रूपाने सर्व मानवजातीला झाला. मात्र, लशीसंदर्भात संशोधन करताना आपण काही टप्पे वगळून थेट उडी मारत लस प्रत्यक्षात आणली. परिस्थितीची व्यवहार्य गरज म्‍हणून शास्रज्ञांनी हे केले. पण, याचा काहीसा गैरअर्थ संशोधकांच्या गटांनी घेतल्याचे दिसते. त्यामुळे कमी संख्येतील नमुन्यांच्या आधारे घाईघाईत अपुऱ्या संदर्भाने शोधनिबंध प्रकाशित करण्याचे प्रमाण कोरोनाकाळात वाढलेले दिसते. विशेष म्हणजे यासंबंधीसुद्धा पीएलओएस वन या संकेतस्थळावर एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

निष्कर्ष

  • कोरोनाकाळात शोधनिबंध मागे घेण्याचा दर दुप्पट

  • मागे घेण्याची प्रक्रिया विसंगत आणि संदिग्ध

  • अजूनही मूळ संकेतस्थळावर निम्म्याहून अधिक शोधनिबंध उपलब्ध

  • मागे घेण्याची प्रक्रीया सुधारण्याची आवश्यकता

  • प्रकाशनपूर्व अर्थात प्री-प्रिंट शोधपत्रिकांविषयी तातडीने उपाययोजना आवश्यक

परिणाम

  • नव्या व्हेरिएंटसंदर्भात चुकीच्या निष्कर्षांमुळे प्रशासनाच्या नियोजनावर परिणाम

  • पुढील संशोधनाला चुकीची दिशा प्राप्त होते

  • नकारात्मक निष्कर्षांमुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित होते

  • अफवा आणि भीतीदायक वातावरण पसरते

वैद्यकशास्त्रातील संशोधनाला वेळ लागतो. साथीच्या काळातील आवश्यकता म्हणून कोरोना लशीच्या बाबतीत काही पायऱ्या टाळल्या. त्यामुळे शास्रज्ञांच्या विशिष्ट गटाने याच पद्धतीचा अवलंब केल्याचा दिसतो. निश्चितच कोरोनाकाळात घाईघाईने शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे परिपूर्ण शोधनिबंधांसाठी एक मार्गदर्शक प्रणाली आवश्यक आहे.’’

- डॉ. पंडित विद्यासागर, जैवभौतिकशास्रज्ञ, माजी कुलगुरू, एसआरटीएम विद्यापीठ, नांदेड

शोधनिबंध मागे घेण्याचे प्रमाण कोरोनाकाळात दुप्पट झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे हे शोधनिबंध अजूनही संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असणे चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील संशोधनाला चुकीची दिशा मिळेल.

- डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ शास्रज्ञ, आयसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

मजुराचं भाग्य उजळलं! रस्यावर पडलेल्या दगडामुळे झाला लखपती; म्हणाला, देवीचा आशीर्वाद...

Latest Marathi News Live Update: बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको

Video Viral: भगव्या लॅम्बॉर्गिनीतून रोहित शर्मा मुंबई विमानतळावर पोहोचला, चाहत्यांना सेल्फी देऊन वैतागला...

'दिसला गं बाई दिसला' ललित प्रभाकरसोबत गौतमी पाटीलच्या जुन्या गाण्याच्या रिमेकवर कातिल अदा, नेटकरी म्हणाले, 'गाण्याची वाट लावली..'

SCROLL FOR NEXT