corona update 28 oct india cross 80 lakh mark 
देश

Corona Update - देशात रुग्णांची संख्या 80 लाखांवर; रिकव्हरी रेट तब्बल 91 टक्के

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतातील कोरोना ससंर्गाचा वेग सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत कमी झाला असला तरी धोका कमी झालेला नाही. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 80 लाखांच्यावर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात देशात 49 हजार 881 नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 80 लाख 40 हजार 203 इतका झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 1 लाख 20 हजार 527 इतकी झाली आहे. 

कोरोनाच्या लेटस्ट आकडेवारीनुसार सध्या देशात 6 लाख 3 हजार 687 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात 56 हजार 480 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील 73 लाख 15 हजार 989 कोरोनाबाधित ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. 

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या जरी 80 लाखांवर पोहोचली असली तरी रिकव्हरी रेटही वाढला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरीचा रेट जवळपास 91 टक्के इतका आहे. तसंच पॉझिटिव्हीटी रेट 4.63 टक्के इतका आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 1.49 टक्के इतके आहे. बुधवारी दिवसभरात देशात 10 लाख 75 हजार 760 कोरोना चाचण्या झाला आहेत. आतापर्यंत देशात एकूण 10 कोटी 65 लाख 63 हजार 440 टेस्ट झाल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. 

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगातील जवळपास 4 कोटी 44 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले. तर 11 लाख 73 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT