Corona Update India esakal
देश

भारतात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ; 24 तासांत 17,336 प्रकरणं समोर

सकाळ डिजिटल टीम

जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय.

नवी दिल्ली : जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना महामारीचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय. गेल्या 24 तासांत इथं 17,336 नवीन कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत, तर 13 जणांचा मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत आज 30 टक्के जास्त प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. काल एकूण 13,313 नवीन प्रकरणं नोंदवली गेली.

आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) सांगण्यात आलं की, आता देशभरात कोरोनाचे 88284 सक्रिय रुग्ण आहेत. यासह देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 4 कोटी 33 लाख 62 हजार 294 झाली आहे. त्याचवेळी, देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 954 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. कालचं बोलायचं झालं तर देशभरात 13 जणांचा मृत्यू झालाय. यामुळं कोविड मृत्यू दर 1.21 टक्के झाला आहे.

आता दिवसेंदिवस नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. देशभरात 88,284 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण संसर्गाच्या 0.20 टक्के सक्रिय प्रकरणं झाली आहेत. सध्या देशातील रिकव्हरी रेट 98.59 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 13,029 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 4 कोटी 27 लाख 49 हजार 056 लोकांनी या साथीवर मात केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT