Corona Update 
देश

Corona Update : महाराष्ट्रात 3,431 नवे रुग्ण; गेल्या 24 तासांत भारतात 251 रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारताला देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. सध्या लसनिर्मिती प्रयत्न जगभरात सुरु आहेत. ब्रिटन, अमेरिका, इस्रायलसारख्या देशांत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर यातच कोरोनाचा नवा विषाणू अस्तित्वात आला आहे. 

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 22,272 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह कोरोनाच्या एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,01,69,118 वर जाऊन पोहोचली आहे.गेल्या 24 तासांत 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह आजवरच्या एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,47,343 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण ऍक्टीव्ह कोरोनाबाधितांची संख्या ही 2,81,667 आहे.

गेल्या 24 तासांत 22,274 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. या बऱ्या झालेल्या नव्या रुग्णांसह कोरोनाच्या आजवरच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 97,40,108 वर जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्यातही सध्या कोरोनाची परिस्थिती आवाक्यात आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,431 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 1,427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 19,13,382 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 18,06,298 रुग्ण आजवर बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 56,823 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT