Corona Updates in India
Corona Updates in India sakal
देश

देशात कोरोनाचा स्फोट! २४ तासात ३ लाख नवे रुग्ण; 491 मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

तिसऱ्या लाटेत २९ डिसेंबरला १० हजार रुग्ण सापडले होते, त्यानंतर फक्त २३ दिवसात रुग्णसंख्या तीन लाखांवर पोहोचली आहे.

दिल्ली - भारतात (India) पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णांची विक्रमी नोंद झाली. बुधवारी दिवसभरात ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात 3 लाख १७ हजार ५३२ रुग्ण सापडले आहेत. भारतात गेल्या वर्षी १५ मे रोजी ३ लाखांहून जास्त रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत २९ डिसेंबरला १० हजार रुग्ण सापडले होते, त्यानंतर फक्त २३ दिवसात रुग्णसंख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी एका दिवसात ३ लाख रुग्णांची नोंद ६० दिवसांनी झाली होती. (Corona Patient Daily Count)

गेल्या २४ तासात भारतात २ लाख २३ हजार ९९० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या देशात १९ लाख २४ हजार ५१ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा १६.४१ टक्के इतका आहे. तर ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्या ९ हजार क२८७ इतकी आहे. कालच्या तुलनेत ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत ३.६३ टक्के इतकी वाढ झाली.(Corona News Updates in India)

बुधवारी दिवसभरात देशात ४९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर मंगळवारी ३५७ जणांनी प्राण गमावले होते. देशात कोरोना चाचण्या तातडीने वाढवण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. आतापर्यंत देशात ७० कोटी ९३ लाख ५६ हजार ८३० टेस्ट झाल्या आहेत. तर बुधवारी दिवसभरात १९ लाख ३५ हजार १८० चाचण्या झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. जानेवारीत भारत आणि अमेरिकेशिवाय अर्जेंटिना हा एकमेव देश होता जिथं एका दिवसात एक लाख रुग्ण आढळले होते. अमेरिका, रशिया, कॅनडा, मेक्सिको आणि पॉलंड या देशांच्या तुलनेत भारत मृत्यूदर कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT