corona 
देश

Corona Update : गेल्या 8 महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णवाढ; आतापर्यंत 39,50,156 जणांना लस

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 8,635 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 8 महिन्यांमध्ये आढळलेली ही सर्वांत कमी रुग्णसंख्या आहे. या नव्या रुग्णसंख्येसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,07,66,245 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 13,423 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,04,48,406 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,54,486 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,63,353 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. देशात 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत 39,50,156 जणांना लस दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 6,59,422 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,77,52,057 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 1,948 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 20,28,347 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 3,289 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या  बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुगांची संख्या ही 19,32,294 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 51,109 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात एकूण 43,701 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT