corona 
देश

Corona Update : गेल्या 24 तासांत 412 रुग्णांचा मृत्यू; रिकव्हरी रेट वधारला

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीय. दररोज नवे कोरोनाबाधित रुग्ण देशात सापडतच आहे. कोरोनाची परिस्थिती ही आधीपेक्षा निश्चितच चांगली असली तरीही ती आवाक्यात नाहीये. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. 

गेल्या 24 तासांत भारतात 31,522 रुग्ण सापडले आहेत. सध्या देशातील एकूण ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 3,72,293 इतकी आहे. याबाबतची माहिती भारताच्या आरोग्या मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांत 37,725 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सध्या 92,53,306 झाली आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट 94.66 टक्के आहे. देशात आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 97,67,372 झाली आहे. गेल्या 24 तासांत 412 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. या नव्या मृत्यूंसह देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 1,41,772 वर गेली आहे. 

हेही वाचा - ब्रिटननंतर कॅनडामध्ये 'Pfizer लशी'ला मान्यता
कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जगभरात लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अलिकडेच ब्रिटनने फायझर या लशीला आपत्कालीन परिस्थितीतील वापरासाठी मान्यता दिली आहे. ब्रिटननंतर आता कॅनडा या देशाने सुद्धा या लशीला 16 वर्षे वयावरील लोकांसाठी मान्यता द्यायचा निर्णय घेतला आहे. भारतात सुरु असलेल्या लसनिर्मितीच्या प्रक्रियेलाही गती आहे. लवकरच काही आठवड्यांतच लस येईल, असं सरकारकडून जाहिर करण्यात आलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई- मडगांव/हटिया आणि पुणे -दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त होळी विशेष चालवणार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT