corona update india 
देश

Corona : देशात 113 रुग्णांचा शनिवारी मृत्यू; रुग्णसंख्येत वाढ

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : घसरतीला लागलेली कोरोनाची आकडेवारी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेली ही वाढ चिंताजनक मानली जात असून खबरदारी घेण्याचं आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. प्रामुख्याने विदर्भात कोरोनाचा धुमाकूळ वाढलेला दिसून येतो आहे. या पार्श्वभूमीवरच कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरु आहे. तर आता खासगी रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधक लसीसाठी 250 रुपये प्रतिडोस प्रमाणे मिळू शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 16,752 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,10,96,731 वर पोहोचली आहे. काल राज्यात 11,718  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,07,75,169 वर पोहोचली आहे. काल देशात 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,57,051 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे 1,64,511 रुग्ण ऍक्टीव्ह आहे. भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतात 1,43,01,266 लोकांना लस देण्यात आली आहे. लवकरच भारतात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरवात होणार आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 8,623 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 21,46,777 वर पोहोचली आहे. राज्यात काल 3,648 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20,20,951 वर पोहोचली आहे. राज्यात काल 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 52,092 वर पोहोचली आहे. सध्यघडीला राज्यात 72,530 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT