Axar Patel reluctant to continue as Delhi Capitals captain
esakal
Axar Patel reluctant to continue as Delhi Capitals captain: अक्षर पटेलच्या ट्रेडचे वृत्त फेटाळून लावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्ससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. अक्षर पटेलने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या पर्वात संघाचे नेतृत्व करणार नसल्याची इच्छा संघ व्यवस्थापनाकडे बोलून दाखवली आहे. दिल्लीने काही वर्षांपूर्वी अक्षरची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती आणि २०२५ व २०२६ च्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली संघाला प्ले ऑफमध्ये प्रेवश मिळवता आला नाही. अक्षरने IPL 2027 मध्ये कर्णधारपदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्यांची धावपळ सुरू झाली आहे.