corona update india
corona update india 
देश

Corona Update : गेल्या 24 तासांत 137 रुग्णांचा मृत्यू; 5,50,426 कोरोनाच्या चाचण्या

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 12,689 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,06,89,527 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 13,320 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण  बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,03,59,305 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,53,724 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,76,498 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात एकूण 20,29,480 लोकांचे लसीकरण केले गेले आहे.

काल 5,50,426 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,36,13,120 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्रर राज्यात 2,405 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 20,13,353 वर पोहोचली आहे. राज्यात काल 2,106 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 19,17,450 वर पोहोचली आहे. काल राज्यात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 50,862 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 43,811 आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT