corona update sakal Media
देश

देशात दिवसभरात ३४ हजार ११३ नव्या रुग्णांची नोंद; ३४६ मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

भारतात सोमवारी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत २४ टक्के घट झाली. गेल्या २४ तासात देशात ३४ हजार ११३ नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी देशात ४४ हजार ८७७ नवे रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी २६ लाख ६५ हजार ५३२ इतकी झाली आहे.

कोरोनामुळे गेल्या २४ तासात देशात ३४६ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ५ लाख ९ हजार ११ जणांनी प्राण गमावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

काल दिवसभरात देशात ९१ हजार ९३० जणांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४ कोटी १६ लाख ७७ हजार ६४१ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ४ लाख ७८ हजार ८८२ इतकी आहे. रिकव्हरी रेट ९७.६८ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यू दर १.१९ टक्के इतका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT