India Corona Patient Update sakal
देश

देशात नव्या रुग्णसंख्येत ६.८ टक्के वाढ; १ हजार मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठवड्याभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे.

नवी दिल्ली - देशात (India) गेल्या २४ तासात कोरोनाचे (Corona) १ लाख ७२ हजार ४३३ नवे रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या नव्या संख्येत ६.८ टक्क्यांची वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. आतापर्यंत जवळपास १६७.८७ कोटी डोस देण्यात आले आहे. (India Corona Patient Update)

गेल्या आठवड्याभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. रिकव्हरी रेट हा ९५.१४ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५ लाख ३३ हजार ९२१ रुग्ण आहेत.

देशात काल दिवसभरात २ लाख ५९ हजार १०७ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ३ कोटी ९७ लाख ७० हजार ४१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४ तासात १ हजार ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ४ लाख ९८ हजार ९८३ इतकी झाली आहे.

जगात आतापर्यंत ३८ कोटी १ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात जवळपास ५६ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी डेल्टा व्हेरिअंटमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली होती. त्यानंतर आता ओमिक्रॉन या नव्या वेगाने संसर्ग होणाऱ्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT