देश

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत किंचित घट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या सातत्यानं वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारच्या तुलनेत घट झाली आहे. वाढती रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेचा इशारा देत असल्याचंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 38 हजार 628 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 18 लाख 95 हजार 385 झाली आहे.

भारतात सक्रीय रुग्णांची संख्या 4 लाख 12 हजार 153 इतकी झाली आहे. आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 55 हजार 816 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनामुळे 4 लाख 27 हजार 371 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात लसीकरण मोहिम सुरु असून गेल्या सात महिन्यात 50 कोटी 10 लाख 9 हजार 609 जणांना लस देण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 49 लाख 55 हजार 138 जणांना लस दिली.

देशातील एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांची संख्या ही 1.29 टक्के इतकी आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांच्या खाली आहे. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा 2.39 टक्के आहे. गेल्या 12 दिवसांपासून हा दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत देशात 47 कोटी 83 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT