Corona 
देश

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 44 हजार 643 नवे रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सक्रीय रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत 3 हजार 83 इतकी वाढ झाली.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना कोरोनाच्या नव्या रुग्णंसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक अशी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 643 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 464 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 41 हजार 96 इतकी आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 4 लाख 14 हजार 159 इतकी असून आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 26 हजार 754 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सक्रीय रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत 3 हजार 83 इतकी वाढ झाली. आतापर्यंत देशात 3 कोटी 18 लाख 56 हजार 757 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिमसुद्धा वेगाने सुरु असून जवळपास 50 कोटी नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात 57 लाख 97 हजार 80 जणांनी लस घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 46 कोटींहून जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील 27 लाख 26 हजार 494 जणांना गुरुवारी पहिली लस घेतली. तर 4 लाख 81 हजार 823 जणांनी दुसरा डोस घेतला. लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील एकूण 16 कोटी 92 लाख 68 हजार 754 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 1 कोटी 7 लाख 72 हजार 537 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 6 हजात 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63 लाख 36 हजार 220 इतकी झाली आहे. दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 74 हजार 995 इतकी झाली आहे. दिवसभरात 7,120 रुग्ण बरे झाले तर 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT