corona 
देश

Corona Update : कोरोना परिस्थिती दिलासादायक; आकडेवारीत घसरण 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 98.57 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी 93.57  लाख लोक बरे आतापर्यंत कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट 94.93 टक्के आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा - Farmers Protest : दिल्लीकडे जाणारे रस्ते करणार जाम; आमरण उपोषणाचा दिला इशारा
12 डिसेंबरपर्यंत एकूण 15,37,11,833 लोकांची कोरोना चाचणी केली गेली आहे. यातील 10,14,434 चाचण्या या गेल्या 24 तासांत करण्यात आल्या आहेत. याबाबतची आकडेवारी इंडियन काऊंसिल ऑफ मेडीकल रिसर्चने दिली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ताज्या आकडेवारीनुसार 98,57,029 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,254 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1,43,019 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 391 रुग्ण मृत्यू पावले आहेत. कोरोनाच्या विळख्यातून स्वत:ला मुक्त करत 93,57,464 जण उपचारांनंतर घरी  गेले आहेत.

सध्या देशाचा कोरोना मृत्यू दर हा 1.45 टक्के आहे.सध्या देशातील कोरोनाबाधितांची ऍक्टीव्ह रुग्णसंख्या ही 3,56,546 आहे. सध्या जगाची परिस्थिती पाहता कोरोना रुग्णांच्या संदर्भात अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक  लागतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT