Corona Update 
देश

Corona Update : रिकव्हरी रेट 95 टक्के; देशात 3,22,366 ऍक्टीव्ह रुग्ण

सकाळवृत्तसेवा


नवी दिल्ली : काल बुधवारी भारतामध्ये नवे 24,010 रुग्ण सापडले. तर भारताचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांत सापडलेल्या नव्या रुग्णांसह भारतातील एकूण आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ही 99,56,558 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 355 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांच्या मृत्यूसह एकूण मृतांची संख्या 1,44,451 वर जाऊन  पोहोचली आहे. सध्या देशात 3,22,366 इतके कोरोनाचे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. 

गेल्या 24 तासांत 11,58,960 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या नव्या चाचण्यांसह एकूण आजवर 15,78,05,240 कोरोनाचाचण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.

ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर जगातील इतर देश या लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार वर्ष 2022 पर्यंत जगातील पाचवा हिस्सा म्हणजे सुमारे 20 लोकांना कोरोनाच्या लशीसाठी 2022 पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT