Mumbai Corona Update  esakal
देश

Corona Updates : 24 तासांमध्ये 11 हजार नवीन रुग्ण; देशात कोरोना झपाट्याने पसरतोय

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशामध्ये कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह इतर प्रशासकीय यंत्रणांवर मोठा ताण येत आहे. मागच्या २४ तासांमध्ये तर कोरोनाचा आकडा ११ हजारांच्या पुढे गेलाय.

देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांमध्ये देशात ११ हजार १०९ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ४९ हजारांच्या पुढे गेलीय.

हेही वाचाः Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काल म्हणजे १३ एप्रिल रोजी १० हजार १५८ नवीन रुग्ण आढळून आलेले होते. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं निदर्शनात येत आहे. पुढील १० दिवस कोरोना रुग्णसंख्येत अशीच वाढ होणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यानंतर कोरोना कमी होईल, असंही सांगितलं जातंय.

देशात ९ एप्रिल रोजी ५ हजार ३५७ कोरोना रुग्ण आढळले होते. १० एप्रिल रोजी ५ हजार ८८० रुग्ण, ११ एप्रिल रोजी ५ हजार ६७६, १२ एप्रिल रोजी ७ हजार ८३० तर १३ एप्रिल रोजी १० हजार १५८ कोरोना रुग्ण आढळले होते.

दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सध्या कोरोना ५० हजारांच्या घरात असला तरी तो झपाट्याने वाढत आहे. पुढच्या आठवड्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यत वर्तवण्यात येतेय. मुंबईमध्ये महानगर पालिका कर्मचाऱ्यांना आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT