Vaccination to Children Sakal
देश

मार्चमध्ये 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण? अधिकाऱ्यांचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात (India) गेल्या जानेवारी महिन्यापासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. फ्रंटलाईन वर्कर्स आणि त्यानंतर 18 वर्षे वयावरील लोकांना ही लस देण्यात येऊ लागली. गेल्या काही दिवसांपासून 15 ते 18 वर्षे वयोगटाला लस देण्यात येऊ लागली आहे. त्यानंतर आता 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची (Corona Vaccination) चर्चा सुरु झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्च महिन्यात सुरु होऊ शकते, असं मत NTAGI चे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा (Dr N K Arora) यांनी मांडलं आहे.

15-18 वयोगटातील अंदाजे 7.4 कोटी (7,40,57,000) लोकसंख्येपैकी, 3.45 कोटींहून अधिक लोकांना आतापर्यंत Covaxin चा पहिला डोस मिळाला आहे आणि त्यांचा दुसरा डोस 28 दिवसांत देणे प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले आहेत. या वयोगटातील पौगंडावस्थेतील मुले लसीकरण प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होत आहेत आणि त्यांच्या लसीकरणाची गती पाहता, 15-18 वयोगटातील उर्वरित लाभार्थींना जानेवारी-अखेरपर्यंत पहिल्या डोस दिला जाऊ शकतो. त्यांना दुसरा डोस फेब्रुवारीच्या अखेरीस दिला जाण्याची अपेक्षा आहे, असं नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) च्या कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष अरोरा म्हणालेत.

एकदा 15-18 वयोगटाचे लसीकरण झाले की, मार्चमध्ये 12-14 वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, १२-१४ वयोगटातील अंदाजे ७.५ कोटी लोकसंख्या आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT