Corona Vaccination for children  sakal media
देश

Children's Vaccination : CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Corona Vaccination for children : देशाता आता 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण (Child Vaccination) सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) याची नुकतीच घोषणा केली. यासाठी या मुलांना 1 जानेवारी 2022 पासून CoWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे, 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण 3 जानेवारी 2022 पासून सुरू होईल.

CoWIN वर नोंदणी कशी कराल

- सध्या, CoWIN प्लॅटफॉर्मवर फक्त भारत बायोटेकच्या Covaxin (Bharat Biotech Covaxin) चा पर्याय असेल. 25 डिसेंबर रोजी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. Zydus Cadila ची ZyCoV-D लस देखील लहान मुलांसाठी वापरण्यासाठी मंजूर केली असली तरी ती प्रथम प्रौढांना दिली जाईल.

मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत नोंदणी करू शकतात तसेच स्वतंत्रपणे नोंदणी देखील करू शकतात. त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यास, मुले त्यांच्या विद्यार्थी ओळखपत्राच्या मदतीने देखील नोंदणी करू शकतात. एका मोबाईलवर नंबरवर एका कुटुंबातील चार सदस्यांची नोंदणी करता येते.

- लहान मुले लसीकरणासाठी जवळच्या मान्यताप्राप्त केंद्रात देखील जाऊ शकतात. याबाबतचा निर्णय राज्य सरकारे घेतील.

डॉ. शर्मा म्हणाले की, "15 ते 18 वयोगटातील मुलं 1 जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी 10 वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे"

आता देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT