corona_20covid
corona_20covid 
देश

corona update: महामारीचा वेग मंदावला; सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोना महामारीचा वेग मंदावला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.भारतात गेल्या 24 तासात 43,893 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 79,90,322 वर पोहोचली आहे. मंगळवारी 508 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला. देशात आतापर्यंत 1,20,010 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुणांची संख्या 6,10,803 झाली आहे. गेल्या 24 तासाच सक्रिय रुग्णांच्या संख्येत 15,054 ने घट झाली आहे. आतापर्यंत देशात 72,59,509 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गेल्या 24 तासात 58,439 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एका दिवसातील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

देशात आतापर्यंत 10,54,87,680 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी 10,66,786 चाचण्या घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने Indian Council of Medical Research (ICMR) दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT