corono_update 
देश

कोरोनाचा वेग आणखी मंदावला, अनेक महिन्यानंतर मृतांची संख्याही 500 पेक्षा कमी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 79 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक दिवसानंतर कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी आढळली आहे.

गेल्या 24 तासात 45,149 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 79,09,960 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही घटली असून गेल्या 24 तासात 480 जणांचा जीव गेला आहे. आतापर्यंत 1,19,014 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 6,53,717 झाली आहे. रविवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येत 14,437 ने घट झाली. आतापर्यंत 71,37,229 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. गेल्या 24 तासात 59,105 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miss Universe 2026: भारताची १९ वर्षीय सौंदर्यवती यंदा 'मिस युनिव्हर्स'च्या मुकुटावर नाव कोरणार? जाणून घ्या काजियाचा प्रवास

तीन महिन्यांत चांदी तब्बल १ लाखांनी स्वस्त! आता भाव आणखी कोसळणार की उसळी घेणार?

IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या ODI, T20I अन् Test सामन्यांसाठी संघ जाहीर; लॉरा वूल्फार्ट कर्णधार

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा संशय! मृतदेहाजवळ नारळ, लिंबू, अंडी अन् दारूची बाटली, घटना CCTV त कैद

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २१ नोव्हेंबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT