Deltacron Variant esakal
देश

देशात कोरोनाची चौथी लाट ? काही राज्यांमध्ये नवीन व्हेरिएंटचे रग्ण

भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरली, मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून बरेच निर्बंध हटवण्यात आले आहेत. असं असताना देशात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटमुळे चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा डेल्टाक्राॅन (Deltacron) हा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. तो ओमिक्राॅन आणि डेल्टा एकत्र येऊन तयार झाला आहे. देशात त्यांचा संसर्ग सुरु झाला आहे. सध्या सात राज्यांमध्ये कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्या सर्वांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. (Corona's Deltacron Variant Patients Found In Seven States Of India)

कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्ली या सात राज्यांमध्ये डेल्टाक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असताना डेल्टाक्राॅन व्हेरिएंटच्या रुपाने चौथी लाट तर येणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र डेल्टाक्राॅन किती घातक असू शकतो आणि त्याची लक्षणे कोणती हे पाहणे गरजेचे आहे. व्हेरिएंटचे रुग्ण कमी असल्याने तो किती गंभीर स्वरुप घेईल हे आताच सांगत येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

डेल्टाक्राॅनची लक्षणे

- भोवळ आणि थकवा येणे ही दोन प्रमुख लक्षणे आहेत. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसू लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT